Friday, July 25, 2014


दोन लोक जगत असतात आपल्यात. एक जो फक्त आपल्या घरापुरता विचार करतो आणि एक जो फक्त आपला विचार करतो. तुम्हाला हा सिक्वेन्स चुकला असे वाटेल. पण नाही, तसाच आहे. बरोबर. जन्माला आल्यावर ज्या लोकांमध्ये तो वावरतो तो आधी त्या लोकांचा विचार करतो. ते काय बोलतात, ते कसे वागतात, त्यांना काय वाटतं आणि त्यातही माझ्याबद्दल काय वाटतं हा विचारांच्या priority चा सिक्वेन्स असतो. आधी प्रतिक्रिया येताना दिसते. इतर जे करतात त्यावर प्रतिक्रिया. पण ती का आणि कशी येते याचा विचार त्या फक्त आपला विचार करणाऱ्या व्यक्तीला करण्याची इच्छा होणे हे गरजेचं असतानाही तो तसा विचार करताना कुणी आढळून येत नाही. असं का होत असावं? 
माझ्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी मी स्वतः आहे आणि मग इतर सारं काही, हे सत्य खरंच समजायला कठीण आहे का? आणि मी जर केंद्रस्थानी आहे तर आधी मला स्वतःला तपासून, वेगवेगळ्या कसोट्यांवर पारखून, अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून मग व्यक्त व्हायला हवे, हे काम खरंच खूप कठीण आहे? साधं समीकरण आहे - इतरांच्या कृतीवर जर माझ्यातून प्रतिक्रिया उमटत असेल तर मग माझ्याही कृतीची परिणीती अशीच असणार ना? म्हणजे संतापून बोलले तर इतरही उत्तरादाखल संताप व्यक्त करतील, बरोबर? मग आनंद आणि समाधान व्यक्त करत गेले तर परतावाही आनंद आणि समाधानाचा असेल, नाही का? 
आपल्या आत जगणाऱ्या दोन व्यक्तींच्या उभे राहण्याचा सिक्वेन्स बदलायला हवा. आधी माझा विचार म्हणजे स्वार्थी असणं नाही तर तेच सगळ्यात महत्वाचे आहे. जे इतरांकडून अपेक्षित आहे ते मिळवायचे असेल - या इतरांमध्ये समाज म्हणायचे आहे मला - तर आपल्याला आधी त्या सर्व अपेक्षांची पूर्तता स्वतःसाठी करावी लागेल. समाजाचा घटक म्हणून जर मला काही समाजाकडून हवं असेल तर आधी ते समाजाला देण्याची ताकद आणि कुवत मी माझ्यात निर्माण करायला हवी. मला कुणी समजून घेत नाही, माझी कदर करत नाही अशा तक्रारी करतानाची नकारात्मकता जर माझ्यात निर्माण होत असेल तर ती नकारात्मकता मी समाजाच्या ओंजळीत टाकते. त्याऐवजी, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, मी समाजाला ओळखते, त्याच्या चुकांची आणि चांगलेपणाची मला जाण आहे आणि ज्याचा मी ही एक घटक आहे त्या समाजाची ताकद आणि कुवत माझ्या ताकदीवर आणि कुवतीवर अवलंबून आहे हे ज्यादिवशी प्रत्येकाच्या मनात लख्ख उमगेल - उमलेल त्यादिवशी आपल्या आत जगणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये कुठलेही मतभेद, गैरसमज आणि गैरवर्तणूकीला स्थान राहणार नाही. 
त्या आतल्या दोन लोकांच्या जगण्याच्या priority बदलण्याची गरज आहे. आणि मुख्य म्हणजे सजग होऊन जगण्याची गरज आहे. जाणीवा sharpen करण्याची गरज आहे. समरसून जगण्याची गरज आहे. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास नीट निरखून पाहत जगण्याची गरज आहे. खरंच खूप कठीण असतं का असं जगणं? 

वर्षा वेलणकर 

Friday, July 4, 2014

ख़ामोशी से बातें

ख़ामोशी से बातें 

कलम से टपकती स्याही की दो बुँदे 
उठाके मैंने रख दी थी तुम्हारे लबोंपे
इसी उम्मीद में  

के कुछ तो कहोंगी तुम

ख़ामोशी चुभती है तुम्हारी


-------

बातें...
तुने कही हुई वह दो बातें
जो गाँठ बाँध ली है मैंने


के जिंदगी और मोहब्बत
सुर्ख गुलाब होते हैं 
काटों में खिलते हैं 
कांटों में पलते हैं 
काटों में मिलते हैं 
और कांटो से ही छिलते हैं 


बातें...
तेरी कही हुई बातें 

मैंने गाँठ बाँध ली है
गुलाब की सुर्खी का राज 

आज मैंने जाना है
तेरी कही हुई बातों से


वर्षा वेलणकर 

Tuesday, June 10, 2014

सूरज

सूरज

"सुनो, एक बात है जो कहनी है तुमसे…

रोज जब शाम का घुंघट ओढ़े
मिलने आती हो मुझसे
तुम्हारी आग़ोश में समाकर
सुकून मिलता है जी को
ढल जाता हूँ तुमही मे…

तुम्हारी बेपर्वा बिखरीं जुल्फोंकी स्याही में
जब डूब जाता हूँ
टूँट के बिख़र जाता हूँ मैं…

तुम आँखे मूँद लेती हो
तो बेचैन होकर
ढूँढने लगता हूँ
अपनेआप को
ढूंढता हू वजूद अपना
चमचमाते जुगनूओंके ज़िस्म में
फ़लक पे बेतहाशा बिखरे तारोंमे
मैं अपनी रोशनी, अपना वज़ूद ढूंढता फिरता हू
रातभर…स्याह अंधेरोंमे…

बरबस पलकें उठाती हो तुम
मुस्कुराकर देखती हो मुझको
तो सुबह खिलती है आँगन में
बालोंमे अटके टिमटिमाते टुकड़ोंको
बटोंरकर हथेलियोंमे
थाम लेती हो तुम
टूकडोंमे सिमटासा मैं
तुम्हारी मुस्कुराती आँखोमे
फिर ढूंढने लगता हूँ वजूद अपना…

हथेलियोंसे आँगन में
उछाल देती हो मुझे
अपनी रोशनी समेटे
चलता हूँ दिनभर
जलता हूँ दिनभर
अपनीही चकाचौंध रोशनी में
ढूंढता रहता हूँ वजूद अपना…

सुनो, मगर एक बात है जो कहनी है तुमसे…

रोज जब शाम का घुंघट ओढ़े
मिलने आती हो मुझसे
तुम्हारी आग़ोश में समाकर
सुकून मिलता है जी को
ढल जाता हूँ तुमही मे…"

वर्षा वेलणकर


Wednesday, June 4, 2014


जगणं  


पापणी ओली चिंब व्हावी, पाऊस झेलून घेताना
शहारलेल्या झाडाला, घट्ट बिलगुन जाताना
वारा यावा मृदगंध घेऊन, श्वासही भिजून जावा
हळव्या मनाच्या मातीत, तो एक क्षण रुजावा 
शिंपण त्याला पापणीतून झरणाऱ्या पावसाचं 
कधी ओल्या दिवसांचं अन मातीच्या गंधाचं 
अंकुरेल क्षण तशा पालवत जातील आशा 
विस्तारण्यासाठी त्याला पुरतील दाही दिशा?
असे क्षण रुजवून-भिजवून राखलय एक रान 
पाऊस झेलत, चिंब भिजत, जगणे एक तूफान 

वर्षा वेलणकर 

Thursday, May 22, 2014

गुल्लक

गुल्लक 

कल रात बडी उमस थी हवा में 
नींद नहीं आयी तो गुल्लक तोड़ा 
सिक्के उंडेलके बैठ गई गिनने 

कुछ रोज मिलनेवाले सिक्के थे 
इन्हें संभालके रखो तो पर्स भारी हो जाता हैं 
रोज शाम घर आतें ही पर्स खोलकर 
सिक्के गुल्लक में डाल देती हू 
जरूरत से ज्यादा होते हैं शायद 
इनका वजन उठाने की न तो हिम्मत होती हैं 
और न ही ताकद 
भारी भारी सा कुछ भी अच्छा नहीं लगता 

कुछ नए सिक्के जो सरकारने बाज़ार में लाए है 
नए है और अच्छे दिखते है तो खर्च करने का मन नहीं होता 
लाकर गुल्लक में डाल देती हू 
गिनती में कम है पर अलग है 
नया हो और अलग भी तो अच्छा लगता है 

कुछ सिक्के अब बाज़ार में नहीं चलते 
और 'अनमोल' हो गए है 
तो इसलिए उन्हें पास ही रख लिया है 
हरबार गुल्लक तोड़ती हु तो इन्हे अलग कर देती हू 
और फिर नए गुल्लक में डाल देती हू 
बिल्कुल सबसे पहले 
ये न तो गिनती में कम होते है न ही ज्यादा 

फिर ख़याल आया,
सारे के सारे सिक्के ही क्यों जमा किए है मैंने?
नोट कहा हैं?
उनका तो मोल ज्यादा होता हैं? 
और वज़न ना के बराबर? 
तो क्यों खर्च कर दिए मैंने?
क्या उन्हें रोज खर्च करना जरूरी था? 

गिनते -गिनते ख़याल आया 
यादें भी तो जमा की है मैंने दिल के गुल्लक में!

कुछ रोज मिलनेवाली, वजन से भारी 
और जरुरत से ज्यादावाली यादें;
कुछ जो नई-नई  अलग दिखनेवाली यादें;
कुछ वो जो अब मायनेँ नहीं रखती और अनमोल है 
न गिनती में कम होती है न ज्यादा 
जिन्हे जतन किया है मैंने 
साथ ही साथ उनकाभी हिसाब लगाना होगा 
जो यादें जमा नहीं की कभी 
नोटों की तरह खर्च कर दी 
जिनका मोल ज्यादा था और वजन कम 

खैर, यह सब फिर कभी होगा 
जब किसी रात  हवा में उमस होगी 
और आंखो से नींद नदारद होगी 

फिलहाल इन सिक्कोंको समेट लू 
कल जाकर दुकानदार को दे आऊ 
बदलें में नोट ले आऊ 
क्योंकी उनका वजन कम होता है 
और मोल ज्यादा!
पर हा एक बात है, नोट ख़र्च हो जाते है!

वर्षा वेलणकर  




Wednesday, May 7, 2014

तुम्हारा साथ



तुम्हारा साथ

लुत्फ़ उठाने ज़िंदगीका 
एक और साँस ली हैं 
हैराँ हैं देख के यह मन्ज़र 
ज़िंदगी तुमसे जो बाँट ली हैं 

एक कोना आँगन का
एक टुकड़ा आसमान 
एक घने पेड़ से टपका 
सपना भी साथ ही हैं 

पत्तोंसे झरती धूप हैं 
बरसात में रिसता पानी 
खुशियोंके गुल-गुंचे है 
ग़मोंकीभी सौगात मिली है 

हर एक पल, हर लम्हा  
आगाज़ नए मौसम का 
होंठोंके गुलोंसे पूछों 
अश्कोंकी नवाजीश हीं है
ज़िंदगी तुमसे जो बाँट ली हैं

वर्षा वेलणकर  


Friday, April 11, 2014

खरं खरं सांगा

खरं  खरं सांगा 

खरंच सांगा बरं मला 
देश नेमका काय असतो?
कष्टणारे दोन हात 
की शर्यतीत धावणारे पाय असतो?

खरंच सांगा मला 
देश म्हणजे नेमकं काय?
कमवून आणणारा बाप 
की घर सावरणारी माय?

खरंच जाणून घ्यायचंय मला 
देशाला कोण चालवतं?
मूठभर नेत्यांचं सरकार 
की लोकसंख्येलाच ते पेलवतं?

खरंच एकदा सांगा कुणी 
नेमकं कोण देशाची शान?
राष्ट्रभक्ती मिरवणारे चेहरे 
की जान देणारे जवान?

वर्षा वेलणकर