Wednesday, June 4, 2014


जगणं  


पापणी ओली चिंब व्हावी, पाऊस झेलून घेताना
शहारलेल्या झाडाला, घट्ट बिलगुन जाताना
वारा यावा मृदगंध घेऊन, श्वासही भिजून जावा
हळव्या मनाच्या मातीत, तो एक क्षण रुजावा 
शिंपण त्याला पापणीतून झरणाऱ्या पावसाचं 
कधी ओल्या दिवसांचं अन मातीच्या गंधाचं 
अंकुरेल क्षण तशा पालवत जातील आशा 
विस्तारण्यासाठी त्याला पुरतील दाही दिशा?
असे क्षण रुजवून-भिजवून राखलय एक रान 
पाऊस झेलत, चिंब भिजत, जगणे एक तूफान 

वर्षा वेलणकर 

1 comment: