Friday, March 7, 2014

"या शहरात आलं की आठवणींचं अगदी मोहळ उठतं… रोज मोठ्या हिकमतीन विरजण लावलेली साय जोरात घुसळावी आणि लोण्याचा गोळा वर तरंगावा तसं काहीतरी घडतं. लोण्यासारखी मऊशार आणि तरीही घट्ट नाती डोळ्यासमोर दिसतात. जीव टाकणारी माणसं दिसतात आणि जीव डोळ्यात गोळा  होतो."
किती पुस्तकी प्रतिक्रिया, म्हणून हसतील सगळे. पण वाटलं तेच आणि तसंच ओठावर आलं तर काय बिघडतं?  पोटात तेच ओठात, असं  असू नये का? पण विराजणातून वर येणाऱ्या लोण्याबद्दल लिहिताना खाली राहिलेल्या ताकाचा आणि त्याच्या पातळ असण्याचा उल्लेख अगदी मनापासून आला तरी लिहू शकते का मी? की टाळावं लागेल ते मला? कुणी दुखवू नये किव्वा कुणाला मुद्दाम दुखवू नये हे देखील पुस्तकातच वाचलंय. मग लिहिताना पुस्तकांना प्रमाण मानूनच लिखाण करावं लागेल. की मनापासून येणारी उर्मी जोपासू?
पुन्हा प्रश्नांच्या जंगलाचा एक प्रवास!
वर्षा वेलणकर 

No comments:

Post a Comment