काही गोष्टी बोलून दाखवण्यासाठीच नाही तर त्यांची जाणीव होण्यासाठीही काही प्रसंगाचं निमित्त लागतं. तुला कदाचित आवडणार नाही पण आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
मला तुला काही सांगायचं आहे आणि तेही लिहून आणि व्यक्तिगत स्तरावर नाही तर सार्वजनिकरीत्या मला काही सांगायचं आहे. तुझ्या सारखं वाढता आलं असतं तर रोज वाढदिवस साजरे केले असते मी. पण तीच तर गम्मत आहे. विशेष लोक वरूनच विशेष बनून येतात. आणि तुझं वैशिष्ट्य काय तर तू तू आहेस. तुझ्या झाडांसारखी खूप प्रामाणिक आहेस. कधीही दुष्टपणा न करणारी व्यक्ती पाहिली आहे का, असं कुणी विचारला मला तर मी अभिमानान सांगेन कि फक्त पाहिलीच नाही तर तिच्याशी माझं नातं आहे आणि तेही रक्ताचं.
लहानपणी आम्ही गम्मत करायचो कि जर तुला त्रास द्यायचा असेल तर तुझ्या झाडाचं एक एक पान तोडावं म्हणजे तुझा करायचा तेवढा छळ होणार. कारण त्यात तुझा जीव आहे. कारण ते तुझ्याच सारखे आहेत एकदम आत बाहेर एकसारखे. त्यांचं जर काही वाईट झाला तर ते इतरांच्या हलगर्जीपणामुळेच होणार. तुझही तसच आहे. तुझा होणारा संताप किव्वा तुला होणारे त्रास हे इतर लोक तुझ्याशी जसे वागतात त्यामुळे उद्भवतात. इतरांच्या हलगर्जीपणाला झाड दुष्टपणे उत्तर देत नाही. तुही तस करत नाहीस. फक्त स्वतःच त्रास करून घेता तुम्ही….तुझं झाड आणि तू! का वागले ते असं, हा तुझा कायम प्रश्न असतो. त्याला माझं उत्तर ठरलेलं असतं. तू फार साधी आहेस आणि हे जग तसं नाही आणि शहाणे लोक हेही सांगतात कि या जगात जगण्यासाठी अस साधं राहून चालत नाही. पण नको. तू आहेस तशीच राहा. तसं करताना आणि जगताना तुला होणारा त्रास दिसतो आम्हाला. पण व्यावहारिक जगणं त्याहीपेक्षा त्रासदायक आहे. त्यावर चर्चाही नको. निदान तुझ्या वाढदिवसाला तर नाहीच नाही.
तू फुलापानांमध्ये रमतेस तशीच तू तुझ्या विद्यार्थ्यामधेही रमतेस. शिकवणं तुला खूप आवडतं पण म्हणून तू सारखी सगळ्यांना शिकवण देत फिरत नाही. म्हणून तर तू आणखी special आहेस. त्यांचे results लागले कि तुला होणारा आनंद त्या मुलांपेक्षाही जास्त असतो हे मी त्यांना न भेटताही सांगू शकते. कुठल्याही पुरस्कारानं या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही कि तू किती चांगली शिक्षिका आहेस. तू आहेस कारण तू त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. त्याच्या अभ्यासासाठी तू अभ्यास करतेस आणि सगळ्यात महत्वाच जर काही असेल तर तू त्यांना समजून घेतेस. लहान भावंड म्हणून आम्हाला समजून घेतलसं इतके वर्ष तसच तू त्यानाही वागवतेस. म्हणून तू विशेष आहेस. एक खूप छान शिक्षिका.
तू आमच्या साठी काय काय केलंस ते इथे सांगण्याची गरज नाही. घरात मोठं असणे जे काही बरोबर घेऊन येतं ते सारं तुझ्या वाट्याला आलं. लहान म्हणून आमचा तुला त्रासही भरपूर झाला. पण आमचा काय दोष त्यात? लहानच होतो आम्ही आणि अजूनही तुझ्यापेक्षा लहानच आहोत. राहूही. कारण तुझ्या सारखं मोठं होता येणं अजीबात शक्य नाही. म्हटलं ना, तस करता आलं असत तर रोज वाढदिवस साजरा केला असता मी.
आज तुझा वाढदिवस साजरा करते आहे मनातल्या भावना व्यक्त करून.
बघ. किती लहान आहे मी. तुझ्या वाढदिवसाला तुला काही देण्याऐवजी स्वतःचाच फायदा करून घेतला.
नेहमी सारखं, जाऊ दे. पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.
अप्रतिम आणि खूप अर्थपूर्ण, काकू!
ReplyDeleteThanx niru. Mala kharatar khup kahi lihych hota. Pan shabdanchya maryada itakya aahet ki exact shabd sapadale nahi. She is the one who raised me actually. Mazya collegechya admission pasun te nokaritalya adchaninparyant tina mala kayam saath dili aahe. Pan aapn kdhihi aapalya lokanch asa jaahir kauguk karat nahi. Anekda bolayach te rahun jaata aani nako te bolalaya jaata. Mhanun lihila mi hey.
ReplyDeleteThanx niru. Mala kharatar khup kahi lihych hota. Pan shabdanchya maryada itakya aahet ki exact shabd sapadale nahi. She is the one who raised me actually. Mazya collegechya admission pasun te nokaritalya adchaninparyant tina mala kayam saath dili aahe. Pan aapn kdhihi aapalya lokanch asa jaahir kauguk karat nahi. Anekda bolayach te rahun jaata aani nako te bolalaya jaata. Mhanun lihila mi hey.
ReplyDeleteGood one.
ReplyDeleteWish your tai a happy b'day
My problem is that when it comes to communicating with or expressing about people close me, I am lost -- I don't find words.. But I am happy that my younger sister has mastered the art of finding words for her expression and communication... I am proud of my both the sisters for different reasons but again, where are those words that I am looking for? Good that a part of my feelings have been reflected by Varsha.... Dear Tai, no words to express happiness, honour and indebtedness that one can feel for being your brother.... So, thanks for everything and wishing you all the best..... Ganesh
ReplyDeleteBig Thank you, Minti sorry! Mrs. Varsha welankar aani gaju.
ReplyDeleteMinti, bolghevade pana jara kami kelat tar bar hoil, karan tumachya pavalanvar paul takat dusar ek uttung vyaktimattva tayar hote aahe (Ms.Girishadevi Kanate) tyanchya sathi kahi theva ani jahir pradarshan tala.... pan kahi mhana stuti vachun bar vatat he khar...
Tai saheb, i knw this. bara vatala he manya karayala kay jaata? Jau de, as usual. Girishdevinchya tar aaspaasahi nahi aamhi. Tya mahan aahet...
ReplyDelete