Saturday, July 20, 2013

नो अलविदा....

The Teacher 
गेले काही दिवस प्रत्येक पहाट ओली चिंब होऊनच येते आहे. बेडरूमच्या खिडकीतून दिसणारा गुलमोहर हिरवागार झाला आहे. काही महिन्यांपूर्वी बिल्डींगच्या आवाराची सफाई करायला आलेल्या माणसाने त्याच्या काही फांद्या छाटल्या होत्या. माळी असता तर त्यांनं केलं असतं का असं? मला वाईट वाटलं होतं. पण आता झाड पुन्हा तरारून आलं आहे. जे गेलं होतं ते सारं वैभव त्या झाडानं परत मिळवलं आहे. माझ्या वाईट वाटण्याला किती लवकर छेद दिला त्यानं! मला पुन्हा आनंद देण्यासाठी त्यानं काही वेगळं केलं का? कि ती त्याची वृत्तीच आहे? पण त्याला जाणीवा आहेत का, आणि गमावल्याच दुःखं किव्वा परत मिळवण्याची जिद्द असं काही त्याला कळतं का? जे त्याचं होतं त्याची त्याला जाणीव होती? ते त्याचंच आहे आणि राहावं असा आग्रह कधी त्यानं केला असेल? त्याला काय कळतं, त्याला मन तरी आहे का, असं मला कधीच म्हणवणार नाही कारण त्याच्या इतकं जिवंत काहीही नाही. जे काही त्याच्यावतीन घडतं ते निसर्गदत्त आहे आणि म्हणून त्याच्या इतक सच्च काहीही नाही. 
मग त्याच्या सानिध्यात राहणारे आपण इतके असे विचित्र का वागतो? मिळवणं, उपभोग घेणं, त्याचा आनंद साजरा करणं आणि मग हातून निसटल्या नंतर आक्रंदन. बरं, ते निघून गेलं तर का, याचा जराही विचार नाही. आणि ते गेलं याचं किती दुःखं करावं? इतकं कि जे उरलं आहे, हातात आहे त्याचाशी प्रतारणा! 
आज एक गाणं ऐकलं. एकाच नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या यात प्रकट झाल्या म्हणून वाटलं कि आपणही जरा दृष्टीकोन बदलवून पाहावा. गीतकार म्हणतो:   

जाने कैसे टूटे रिश्तोंसे बिखरे है ये पल 
मानो जैसे गम की पलकोंसे छलके है ये पल 
क्यों अधूरी ये कहानी, क्यों अधूरा ये फ़साना 
क्यों लकिरोंमे इसके, अलविदा 

आणि मग इथेच तो या गीतातील कथेच्या नायिकेला उत्तरादाखल एक विचार देतो. 

उम्रभर का साथ दे जो क्यों वही प्यार हो 
क्यों न मिट के जो फ़ना हो वो भी प्यार हो 
ना अधूरी ये कहानी, ना अधुरा ये फ़साना 
मरके भी ना हम कहेंगे, अलविदा 

जे आवडतं ते आपलंच बनून राहावं हा आग्रह नैसर्गिक आहे का? 
मला प्रश्न पडतात आणि मी त्याची उत्तरही शोधते. काही दिवसांपासून एक विचार आणि एक प्रश्न योग्य शब्दांच्या शोधात भटकत होते. आज या गाण्यात ते शब्द सापडले. म्हणून हा शब्दोत्सव.  

वर्षा वेलणकर 

2 comments:

  1. Good thought... Keep writing.... Your writing is taking a good shape... Just go more deeper and deeper....

    ReplyDelete
  2. Thanks Dada. U appreciating my writing is a compliment. Thanks for introducing me to some good literature...inspiring me to write. It is all because of u...

    ReplyDelete