प्रतिबिंब |
"थोडसं हवं असतं. अगदी थोडं. स्वतःलाच पुरेल इतकं.
थोडसं समाधान हवं असतं. म्हणजे घरात वाद नसल्याचं समाधान. (आई आणि बायको यांच्या गप्पा ऐकण्याच समाधान. त्यांच्यातील संवाद ऐकण्याच समाधान.
आणि वाचक स्त्री असल्यास सासू आणि नवऱ्यात अबोला असल्याच समाधान)
ऑफिसला कुठलीही स्पर्धा नसल्याचं समाधान. (यावर्षी माझ्या अगदी जिवाभावाच्या colleague ला आणि मलाही एकाच वेळी promotion मिळाल्याच समाधान)
डोक्यावर छत असल्याच समाधान. (two bhk पुरेसं आहे पण असलं एखाद रो हाउस तर जास्त समाधान मिळेल. )
पोटाला चार घास असल्याचं समाधान.(म्हणजे शनिवारी दुपारी किव्वा रात्री McD आणि रविवारी एक चक्कर Pizza Hut आणि रात्री थाळी.)
स्वतःसाठी रोजच्या धकाधकीतून थोडा वेळ काढता येत असल्याच समाधान. (एक holiday. फार नाही पण malaysiaला तरी जाता यावं).
गावाकडे राहणाऱ्या आईच्या निपुत्रिक मामांच आपल्यावर प्रेम असल्याच समाधान. (त्यांनी आनंदानं त्यांची संपत्ती प्रेमापोटी देऊ केली तर मनापासून नाही म्हणण्याच आणि त्यांचा आदर म्हणून ती स्वीकार करण्याचं समाधान.)
आणि या पलीकडे प्रत्येक सामान्य माणसाच्या मनोराज्यात धुमाकूळ घालणाऱ्या अपेक्षांची तर जराही अपेक्षा नाही मला. किती थोडं आहे हे. पण ते ही मिळेल तर शपथ. जे काही मिळालं आहे ते सारं काही माझ्या मेहनतीची कमाई आहे. पण मिळालं थोडं आणखी मिळाल्याचं समाधान तर काय वाईट आहे?
पण सारीच दानं उलटी पडताहेत."
(पहिल्या ओळीतील स्पष्टीकरण देणारी व्यक्ती मी नाही म्हणजे वर्षा वेलणकर नाही, याची नोंद घ्यावी.)
No comments:
Post a Comment