Saturday, July 20, 2013

गुलज़ार साब

Add caption
९ मार्च, २०१३
गुलज़ार साब,
आज आपसे मिलनेका दिन शायद मुक़र्रर था। कई साल हो गए है आपके अल्फाजोसे रिश्ता जोडकर। पर उस रिश्तेका कोई नाम नहीं था और ना हीं कभी कोई दिखनेवाला वजुद। हा, पर वो जिंदा था। आज जब आपके पाँव छूने के लिए हाथ बढ़ाये तो आपने कहा "जीते रहो!" जिन्दा तो है हम। क्योंकि साँसे चल रही है. पर जब कभी अहसास की बात चली तो आपसे लफ्ज उधार लेते चले गये हम। कभी ख़ुशी में तो कभी गम में। नाराज हुए तब भी और प्यार किया तब भी। कभी कही कोई रिश्ता, कोई एहसास, कोई सपना, कोई अपना बया करनेकी बात आई तो आपहिकी सहिसे लफ्ज जड़ी तकरिरोका सहारा मिला। बदलेमें कुछ देना नहीं था हमें आपको। इसलिए लेना और आसन हो गया।
आज आपसे मिलने का दिन मुक़र्रर था। शाम आप एक फंक्शन मे लोंगोसे मुखातिब होनेवाले थे। मै भी आना चाहती थी। लेकिन आप और हम लोगोंमे एक दीवार है जो आपको हमसे ऐसेही मिलने नहीं देती। उसी दीवारसे झांकने का इरादा था। झरोखा ढुंढने सुबह सुबह आई तो सामने आपको पाया। आप किताबोंके बीच खड़े थे और कुछ चुनिन्दा लोंगोंसे घिरे थे। नजर आपकी वही थी किताबोंपर। कभी चश्मा उतारकर तो कभी चढाकर आप एक-एक कोना जांच रहे थे। फिर आपकी वही खरजवाली सुकुनभरी आवाज में आपने कहा, "prose बहोत है यहा. पोएट्री कम है।" सही कहा आपने। आजकल लोग बड़े प्रैक्टिकलसे हो गए है। सब कुछ सुलछा हुआ चाहते है। कठिनाई पसंद नहीं उन्हें। जो कुछ कहो इनसे तो वो बिलकुल तरतीब से सजा हुआ, एकदम स्पष्ट। किसी चीज की कोई परते खोलना उन्हें झंझट लगती है। रिश्तेभी इन्हें साफसुथरे, सुलछे हुए चाहिये। प्यार तो प्यार, नाराजगी तो नाराजगी. और जब रिश्तोंमे कोई गाँठ लग जाये तो ये डोर तोड़ देते है। अगर उनसे कहों के, "हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छूटा करते". तो ये पलटकर जवाब देते है, "Come on यार, किस जमाने की बात कर रहे हो?"
खैर, जाने दिजिये। बात बस इतनी थी के आज आपसे मिलने का दिन मुक़र्रर था। शाम को नहीं सुबह्का वक्त तय था। आप बिलकुल वैसे ही लग रहे थे जैसे आप हमेशा होते है। जैसे आपको तसवीरों और टीवी पे देखा है। हमेशा की तरह वो सफ़ेद कुरता और पैजामा। सफ़ेद मोज़े और सफ़ेद स्पोर्टवाले जुते। आपका कुरता वैसेही कड़क था स्टार्च किया हुआ और बहोत सारी सिलवटोंसे भरा। पर फिर भी कड़क था। तना हुआ। हर उस शोहरतमंद इन्सान की तरह जिसे लोग ऊँचा तो उठाते है पर कभी कोई इतनीसिभी बात हो जाए तो उंगली उठानेसे भी नहीं चुकते। वो सारी सिलवटे चुभती तो है पर शख्सियत की मजबुतीकोभी बया करती है।
तो बात ये है, के आज आपसे मुलाकात हुयी। आपके पास आकर बैठने का मौका मिला। आपने नाम पूछा, काम पूछा। जब मैंने कहा के पिछले दिनों आपसे कांटेक्ट करना मुशील हो रहा था, तो आपने वो दीवार भी हटा दी जो आपसे मिलनेसे रोकती है। और जो किताब मैंने आपके हाथों में धर दी थी उसपर आपने लिखा, वर्षा, टू यू, गुलज़ार।
एक बेनाम रिश्ता जो आपके लफ्जोसे कई साल पहले जुड़ा था आज आपके हाथोने उस रिश्ते को एक पहचान दी है। अभीभी मै उस भीड़ का हिस्सा हु जो आपसे मुखातिब होना चाहती है। आपकी लफ्जोकी उधारी पर जीना चाहती है। कुछ सहिसे लफ्ज जड़कर आपसे कहना चाहती है के, गुलज़ार साब, वुई लव यू!
वर्षा वेलणकर

नो अलविदा....

The Teacher 
गेले काही दिवस प्रत्येक पहाट ओली चिंब होऊनच येते आहे. बेडरूमच्या खिडकीतून दिसणारा गुलमोहर हिरवागार झाला आहे. काही महिन्यांपूर्वी बिल्डींगच्या आवाराची सफाई करायला आलेल्या माणसाने त्याच्या काही फांद्या छाटल्या होत्या. माळी असता तर त्यांनं केलं असतं का असं? मला वाईट वाटलं होतं. पण आता झाड पुन्हा तरारून आलं आहे. जे गेलं होतं ते सारं वैभव त्या झाडानं परत मिळवलं आहे. माझ्या वाईट वाटण्याला किती लवकर छेद दिला त्यानं! मला पुन्हा आनंद देण्यासाठी त्यानं काही वेगळं केलं का? कि ती त्याची वृत्तीच आहे? पण त्याला जाणीवा आहेत का, आणि गमावल्याच दुःखं किव्वा परत मिळवण्याची जिद्द असं काही त्याला कळतं का? जे त्याचं होतं त्याची त्याला जाणीव होती? ते त्याचंच आहे आणि राहावं असा आग्रह कधी त्यानं केला असेल? त्याला काय कळतं, त्याला मन तरी आहे का, असं मला कधीच म्हणवणार नाही कारण त्याच्या इतकं जिवंत काहीही नाही. जे काही त्याच्यावतीन घडतं ते निसर्गदत्त आहे आणि म्हणून त्याच्या इतक सच्च काहीही नाही. 
मग त्याच्या सानिध्यात राहणारे आपण इतके असे विचित्र का वागतो? मिळवणं, उपभोग घेणं, त्याचा आनंद साजरा करणं आणि मग हातून निसटल्या नंतर आक्रंदन. बरं, ते निघून गेलं तर का, याचा जराही विचार नाही. आणि ते गेलं याचं किती दुःखं करावं? इतकं कि जे उरलं आहे, हातात आहे त्याचाशी प्रतारणा! 
आज एक गाणं ऐकलं. एकाच नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या यात प्रकट झाल्या म्हणून वाटलं कि आपणही जरा दृष्टीकोन बदलवून पाहावा. गीतकार म्हणतो:   

जाने कैसे टूटे रिश्तोंसे बिखरे है ये पल 
मानो जैसे गम की पलकोंसे छलके है ये पल 
क्यों अधूरी ये कहानी, क्यों अधूरा ये फ़साना 
क्यों लकिरोंमे इसके, अलविदा 

आणि मग इथेच तो या गीतातील कथेच्या नायिकेला उत्तरादाखल एक विचार देतो. 

उम्रभर का साथ दे जो क्यों वही प्यार हो 
क्यों न मिट के जो फ़ना हो वो भी प्यार हो 
ना अधूरी ये कहानी, ना अधुरा ये फ़साना 
मरके भी ना हम कहेंगे, अलविदा 

जे आवडतं ते आपलंच बनून राहावं हा आग्रह नैसर्गिक आहे का? 
मला प्रश्न पडतात आणि मी त्याची उत्तरही शोधते. काही दिवसांपासून एक विचार आणि एक प्रश्न योग्य शब्दांच्या शोधात भटकत होते. आज या गाण्यात ते शब्द सापडले. म्हणून हा शब्दोत्सव.  

वर्षा वेलणकर 

Thursday, July 18, 2013

ताई

काही गोष्टी बोलून दाखवण्यासाठीच नाही तर त्यांची जाणीव होण्यासाठीही काही प्रसंगाचं निमित्त लागतं. तुला कदाचित आवडणार नाही पण आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
मला तुला काही सांगायचं आहे आणि तेही लिहून आणि व्यक्तिगत स्तरावर नाही तर सार्वजनिकरीत्या मला काही सांगायचं आहे.  तुझ्या सारखं वाढता आलं असतं तर रोज वाढदिवस साजरे केले असते मी. पण तीच तर गम्मत आहे. विशेष लोक वरूनच विशेष बनून येतात. आणि तुझं वैशिष्ट्य काय तर तू तू  आहेस. तुझ्या झाडांसारखी खूप प्रामाणिक आहेस. कधीही दुष्टपणा न करणारी व्यक्ती पाहिली आहे का, असं कुणी विचारला मला तर मी अभिमानान सांगेन कि फक्त पाहिलीच नाही तर तिच्याशी माझं नातं आहे आणि तेही रक्ताचं. 
लहानपणी आम्ही गम्मत करायचो कि जर तुला त्रास द्यायचा असेल तर तुझ्या झाडाचं एक एक पान तोडावं म्हणजे तुझा करायचा तेवढा छळ होणार. कारण त्यात तुझा जीव आहे. कारण ते तुझ्याच सारखे आहेत एकदम आत बाहेर एकसारखे. त्यांचं जर काही वाईट झाला तर ते इतरांच्या हलगर्जीपणामुळेच होणार. तुझही तसच आहे. तुझा होणारा संताप किव्वा तुला होणारे त्रास हे इतर लोक तुझ्याशी जसे वागतात त्यामुळे उद्भवतात. इतरांच्या हलगर्जीपणाला झाड दुष्टपणे उत्तर देत नाही. तुही तस करत नाहीस. फक्त स्वतःच त्रास करून घेता तुम्ही….तुझं झाड आणि तू! का वागले ते असं, हा तुझा कायम प्रश्न असतो. त्याला माझं उत्तर ठरलेलं असतं. तू फार साधी आहेस आणि हे जग तसं नाही आणि शहाणे लोक हेही सांगतात कि या जगात जगण्यासाठी अस साधं राहून चालत नाही. पण नको. तू आहेस तशीच राहा. तसं करताना आणि जगताना तुला होणारा त्रास दिसतो आम्हाला. पण व्यावहारिक जगणं त्याहीपेक्षा त्रासदायक आहे. त्यावर चर्चाही नको. निदान तुझ्या वाढदिवसाला तर नाहीच नाही. 
तू फुलापानांमध्ये रमतेस तशीच तू तुझ्या विद्यार्थ्यामधेही रमतेस. शिकवणं तुला खूप आवडतं पण म्हणून तू सारखी सगळ्यांना शिकवण देत फिरत नाही. म्हणून तर तू आणखी special आहेस. त्यांचे results लागले कि तुला होणारा आनंद त्या मुलांपेक्षाही जास्त असतो हे मी त्यांना न भेटताही सांगू शकते. कुठल्याही पुरस्कारानं या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही कि तू किती चांगली शिक्षिका आहेस. तू आहेस कारण तू त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. त्याच्या अभ्यासासाठी तू अभ्यास करतेस आणि सगळ्यात महत्वाच जर काही असेल तर तू त्यांना समजून घेतेस. लहान भावंड म्हणून आम्हाला समजून घेतलसं  इतके वर्ष तसच तू त्यानाही वागवतेस. म्हणून तू विशेष आहेस. एक खूप छान शिक्षिका. 
तू आमच्या साठी काय काय केलंस ते इथे सांगण्याची गरज नाही. घरात मोठं असणे जे काही बरोबर घेऊन येतं ते सारं तुझ्या वाट्याला आलं. लहान म्हणून आमचा तुला त्रासही भरपूर झाला. पण आमचा काय दोष त्यात? लहानच होतो आम्ही आणि अजूनही तुझ्यापेक्षा लहानच आहोत. राहूही. कारण तुझ्या सारखं मोठं होता येणं अजीबात शक्य नाही. म्हटलं ना, तस करता आलं असत तर रोज वाढदिवस साजरा केला असता मी. 
आज तुझा वाढदिवस साजरा करते आहे मनातल्या भावना व्यक्त करून. 
बघ. किती लहान आहे मी. तुझ्या वाढदिवसाला तुला काही देण्याऐवजी स्वतःचाच फायदा करून घेतला. 
नेहमी सारखं, जाऊ दे. पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.