Sunday, December 21, 2014

संवाद

आपण 'कुणीच नाही' या कॅटेगरीत मोडत असताना कलाकृतींच्या सानिध्यात गेलो तर घडणारी बातचीत भन्नाट असते … कुठलाच आविर्भाव नाही… अगदी 'काहीच कळत नाही हं ' आणि 'यातील कशाचाही अजिबात गंध नाही ',  हे हि जेव्हा आडवं येत नाही तेव्हाचा संवाद … तुम्ही बसता त्या कलाकृतीसमोर फतकल मारून…  कान न्युट्रल…  डोळे न्युट्रल आणि मनही न्युट्रल… फक्त कवाडं तेवढी उघडी… अगदी सताड… ऊन, वाऱ्याबरोबरच धूळीसाठीही वेलकमची पाटी घेऊन…  

मग कधी अवचित येते
तरळत गाण्यातील तान
लाटेवर वाहत सागराचे उधाण
चित्रातले रंग
उतरतात मनात  
शिल्प हि सांगते काही
हळुवार कानात

###

खुर्च्यांची रास… खुर्चीची आस… खुर्चीशी संभोग आणि मग त्या खुर्चीचेच भोग… खुर्च्यांचे विविध आकार… खुर्चीचे बहुविध विकार… खुर्च्यांचा आगळाच बाज… खुर्चीच ताज… तीच सरताज… खुर्च्यांसाठी साधना आणि त्यासाठी तिचीच आराधना… मोठ्या खुर्चीपुढे छोटी खुर्ची… मोठ्या खुर्चीची मिजास मोठी… छोट्या खुर्चीची अदब खोटी… मागे बांधलेल्या हातात कट्यार छोटी… आधाराची खुर्ची… वर नेणारी खुर्ची… छोट्या खुर्चीला स्वतःत सामावून घेणारी खुर्ची…गुलाबी, गुबगुबीत बाळ खुर्चीला मांडीत जोजवणारी भारदस्त पण मोडकळीस आलेली वृद्ध खुर्ची… खुर्च्यांना लगटलेल्या मनुष्याकृती गबाळ… बिभत्स… रंगात बरबटलेल्या… किळसवाण्या… शिसारी आणणाऱ्या… आणि खुर्ची मिळाल्यावर बेसावध खुर्चीच्या अधीन झालेल्या… खुर्चीतून लोंबणारे पाय त्या असूरी खुर्चीनं हातात घट्ट आवळून धरलेले… कधीही खेचून घेतले तर बसलेला सपशेल तोंडघशी पडणार हे निश्चित…
जिला आधारासाठी निर्मिले तिच्याच सत्तेत रुपांतरणाचा हा चित्र प्रवास. नाव Man and a chair आहे खरे. पण इथे दिसते ती a chair ची THE Chair होण्याची चित्तरकथा. सत्ता आणि मनुष्य यांची विविध रूपे…
कुठे?
Chandramohan Kulkarni यांच्या डिजिटल चित्र प्रदर्शनात.


Beauty and obnoxiousness...

एखादे झाड कुरूप आहे म्हणून बाजूच्या तळ्यात न्हाऊन, पानांना विंचरून, फाद्यांमध्ये भांग बिंग काढून, शेजारच्या वेलीवरच्या खुडलेल्या कळ्यांचा गजरा बिजरा माळून नाही मिरवत… मग माणूस का करतो असं? स्वच्छ आणि स्वस्थ राहाणं वेगळं… पण सुंदर दिसण्यासाठीचा अट्टाहास? शरीराला विशिष्ट आकार देण्याचा अट्टाहास… हात, पाय, पोट 'देखणं' करण्याचा अट्टाहास… तंग कपड्यात अतरंगी शरीर कोंबण्याचा अट्टाहास… शरीराचा रंग बदलण्याचा अट्टाहास… काळ्याचा तिरस्कार… पांढरेफट्ट होण्याची जीवघेणी लालसा… आणि यात वास्तवाकडे डोळेझाक… पापण्या कोरून घेणे… हातापायावरची लव काढून टाकणे… चेहऱ्याला ब्लिच लावणे… सगळं आग आग करणारे… डोळ्यावर दोन काकडीचे स्लाईस ठेवून घेतले की सुंदर होण्याच्या अट्टाहासासाठीची आणि वास्तवापासून पळून जाण्यासाठीची सगळी जळजळ क्षणभर शांत झाल्याचा आभास निर्माण करणे… या सगळ्याची कीव करावी की  त्याकडे दुर्लक्ष करावे? की हे या घडीचे वास्तव आहे, म्हणून त्याचा स्वीकार करावा? आपणही दोन काकड्यांचे स्लाईस डोळ्यावर ठेवून घ्यावेत की काय?

संदर्भ: Gym Gym आणि Beauty Parlor चित्रमालिका by Chandramohan Kulkarni

###

From minimal to abundance

"You see, I really have wanted to make it so that people get the idea that these folk, who are eating their potatoes by the light of their little lamp, have tilled the earth themselves with these hands they are putting in the dish, and so it speaks of manual labor and — that they have thus honestly earned their food. I wanted it to give the idea of a wholly different way of life from ours — civilized people. So I certainly don’t want everyone just to admire it or approve of it without knowing why." - Vincent Van Gogh on The Potato Eater. 

मातीत घाम गाळून दिवसभराच्या श्रमानंतर पिकवलेल्या अन्नाची चव चाखायला डायनिंग टेबल भोवती बसलेले शेतकऱ्याचे कुटुंब आपल्या चित्रात उतरवताना विन्सेंट वँन गॉगला श्रमाचे महत्व विशद करायचे होते. त्याच्या सुसंस्कृत, उच्चभ्रू समाजाहून वेगळं असं हे शेतकऱ्याचे कुटुंब म्हणूनच आपले अन्न हाताने ग्रहण करत. 
पण आता काळ आणि परिस्थिती बदलली आहे. त्या मोजक्या, जेमतेम, minimalचा परिघ अवास्तव वाढला आहे. त्या तथाकथित सुसंस्कृत, उच्चभ्रू समाजाने या कष्टकरी समाजाला एक विचित्र न्युनगंडाच्या परिघात ढकलून दिलं आहे. श्रमाच्या महत्वापेक्षाही श्रमाच्या मोबदल्याचा अट्टाहास आणि त्या मोबदल्याचा उपभोग उच्चभ्रू समाजाप्रमाणेच घेण्याचा अट्टाहास. वँन गॉगला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या The Potato Eatersची चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढलेली चित्राकृती हा अट्टाहास अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडते. Minimal to abundance, Potato to french fries, थोडक्यात श्रमाचे समाधान ते सततच्या उपभोगतील अपूर्णता, असंतुष्टी, असमाधान, असा काहीसा हा प्रवास आहे. 
अन्न हातात नाही तर काटेरी चमच्यांनी ताब्यात घेतले आहे, वँन गॉगच्या टोप्या घातलेल्या नायिका आता बोडक्या डोक्यांनी, तंग, आधुनिक तोकड्या कपड्यात बसल्या आहेत. त्यांची झुकलेली नजर आता रोखली गेलेली आहे. कोपऱ्यातील टेबलवरची चहाची केटली आता अप्रासंगिक आहे कारण हातात बियरचा मग आलाय. भिंतीवरच्या घड्याळाचा आकार, रुप बदललं आहे. मूळ चित्रातील टेबलवर मध्यभागी मिणमिणताच पण प्रकाश सांडवणाऱ्या दिव्याच्या जागी आता विजेचा दिवा आला आहे. आणि इथेच या minimal to abundanceच्या प्रवासातील कुलकर्णीनी टिपलेला उपरोध अंगावर येतो. अपुऱ्या प्रकाशातही उजळून निघालेले चेहरे आता भरपूर उजेडाची सोय असतानाही अंधार लपेटण्याला उत्सुक आहेत.
पुन्हा तीच कदाचित वास्तवाकडे कानाडोळा करण्याची उर्मी… स्वतःच्या तोकड्या प्रवृत्तींचे, प्रकृतीचे नागवेपण लपवून ठेवण्याची धडपड… दोन काकड्यांच्या चकत्यानी डोळे मिटून घेणे…

वर्षा वेलणकर  

Tuesday, December 16, 2014


क्या नाम हैं तुम्हारा?
किस मीट्टी के बने हो तुम?
क्या ज़ात हैं तुम्हारी?
ऐसी क्योंन सी मज़हब के बाशिंदे हो
जो हमनस्ल को हलाक करने का हुक्म देती हैं?
किस उपरवाले के सामने
इबादत के लिए सर झुकाते हो?
आँखे मूँद कर, हाथ फैला कर क्या दुआ माँगते हो?
क्या उसकी सूरत का कोई जर्रा 
नजर नहीं आया तुम्हे उस नन्ही जान की आँखों में?
उसका नूर क्या उस मासूम चेहरे पर नहीं था
जिसे तुमने अपनी बंदूक की नोक पर धरा था?
क्या कोई भी रिश्ता नहीं था तुम्हारा उससे
जिसे आज तुमने तार तार कर दिया?
कैसा खून दौड़ रहा है तुम्हारी रगों में
जो उस ख़ौफ़ज़दा, थरथराते जिस्म के 
अंदर दौड़ते खून से जुदा हैं?
ये किस मकसद की लड़ाई लड़ रहे हो तुम?
क्या बात रखनी हैं तुम्हें सबके आगे?
क्या मनवाना चाहते हो दुनियासे?
किस चीज़ का बदला लेना चाहते हो?

अब बस घिन आती हैं तुमसे

वर्षा