Thursday, April 9, 2015
Saturday, March 28, 2015
मनीच्या कथा-२
हे जे मन नावाचे प्रकरण आहे न, ते भारीच आहे बुवा! सोबतीला असतं कायम. पण प्रत्येक वेळी त्याचं सारंच काही ऐकायचं आणि, पटलं रे तुझं म्हणणं, असं म्हणायचं, हे काही शक्य नसतं. पण याला ना डावलून चालतही नाही. जरा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कि फुरंगटून बसतं. मग गरज असेल त्याची तरी मदतीला ते धावून येईल तर शपथ! मन आणि शरीर यांची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. त्यात जगाची रीत आहे ती पण भारी छळतेच आपल्याला. अशात मनाने सांगितलेलं एकवेळ पटेल पण अशी मनमानी कृती करायला शरीराची साथ हवी? आणि कृती ही अशी कि जिला समाजाची मान्यता असेल?
पण आता नाहीच धरवत धीर. ती माझी आहे. माझी मैत्रीण आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरील बोलक्या डोळ्याभोवतीचं काळं, नाहीच पाहवत आता. तिच्या मनीची व्यथा आता शब्दांच्या आधाराविना पोचते आहे माझ्यापर्यंत. पण तिचं ते प्रसन्न हसणं? दोन गोष्टी दृश्य आहेत न? मग त्यातील कुठली खरी मानायची? दोन्हीत सत्य -- निदान नजरेला दिसणारे -- आहेच. मग एक खरे आणि एक खोटे कसे ठरवायचे बरे?
म्हणून मग मनाला जरा मदतीला घ्यायचे म्हटले. तर हे आपलं रुसून बसलेलं! म्हणालं, इतका संवाद घडतो आपल्यात पण तू ऐकत नाहीस हा माझं. चुका होतात तुझ्याकडून आणि मग त्रास करून घेतेस जीवाला. या विधानाला कसं बरं नाकारायचं? मनाविरुद्ध जाउन केलेल्याचा शारीरिक आणि मानसिक थकवा किती येतो हे आता नव्याने सांगायला हवे का? मान्य रे मना! नाही ऐकलं तुझं कि त्रास होतोच. पण आता माझ्या भूतकाळातील चुकांचा पाढा वाचू नकोस ना. आत्ताच्या या द्विधा मनस्थितीबद्दल बोल. दिसतंय त्यातील काय खरे आणि काय खोटे?
हसू काय, ठरवून चेहऱ्यावर आणता येतं. पण ते जे डोळ्याभोवतीचे काळे आहे न, तो परिणाम आहे आत चाललेल्या उलाढालीचा, मन सांगू लागतं. उलाढाल? हो. मनाविरुद्धची रस्सीखेच चालली आहे आत आणि आता ती डोळ्यावाटे दिसू लागली आहे. बापरे, माझ्या मनाला तिच्याबद्दल बरंच काही कळतंय. पण तिला विचारलं परवा तर हसण्यावारी नेलं तिनं. म्हणाली, तुला उगाच काहीतरी विचार करायची सवयच आहे. पण मग माझं निरीक्षण बरोबर होतं रे!! मग आता पुन्हा काय बोलू तिच्याशी? सांग तिला तिच्या मनाशी बोलायला आणि त्याचं काही काही ऐकायला. थोडा त्रास होईल. पण मग हळूहळू परिणाम दिसू लागतील आणि जाईल ते काळं, माझं मन मला सांगत होतं.
इथेच तर गाडं अडतं कायम. जे मनाला पटलेलं असतं आणि स्वतःला योग्य वाटत असतं ते स्पष्ट शब्दात बोलून दाखवायला जीभ धजत नाही. का? आता हेच बघा ना. गेले तिला सांगायला कि बाई गं, तुझी काळजी वाटते आणि काहीतरी रुतून बसलंय गं तुझ्या आत मदत करू का तुला वाहतं व्हायला? तर तिला काय वाटेल? तिच्या व्यक्तिगत, खाजगी आयुष्यात दखल दिल्यासारखे होईल का रे मना ते? तिला राग आला, माझं बोलणं नाही आवडलं तर मैत्री संपेल न आमची?
काळजी वाटते आहे ना तिची? माझं मन आता वाद घालण्याच्या मूडमध्ये येतं. ती मैत्रीण आहे ना तुझी? काही आनंदाचे क्षण आणि काही विशेष दोघींच्याही संबंधात आहे ना? मग त्याच काळजीचा हवाला देऊन एक गोष्ट स्वतःलाच विचार बरं? तुझ्या मनात तिच्याबद्दल जे काही चालले आहे ते तिच्यापासून लपवून ठेवणे म्हणजे मैत्री का गं? कुठल्याही नात्याची इमारत सत्याच्या आधारावर उभी असते. असत्य बोलून आणि वागून मैत्री काय काहीच टिकत नाही. तिच्यावर खरंच प्रेम असेल तर तुझ्या मनाने तुला जे सांगीतलं ते तिला स्वच्छ सांग. ते ऐकून तिला नाही आवडलं आणि तिने संबंध संपवले तरी एक समाधान कायम मनात राहील तुझ्या की तू तिच्याशी खोटं वागली नाहीस.
मन भारीच स्ट्रेट फॉरवर्ड आहे, नाही का!
वर्षा वेलणकर

Friday, March 27, 2015
मनीच्या कथा-१
अपेक्षांचे बाई भारी गुंते असतात. स्वेटर विणायला पूर्वी लोकरीचे वेढे मिळायचे आणि ते वेढे दोन मांड्यांमध्ये अडकवून त्याचा गोळा तयार करताना जसा वेढ्यातील गुंता सुटत जातो, तसे हे अपेक्षांचे गुंते सुटावे, असं मनापासून वाटतं. तसं हे विधानही जरा गुंतागुंतीच आहे म्हणा. थोडा हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करूयात.
आपण काहीतरी करतो स्वतःसाठी आणि मग ते सातत्याने करत राहण्याचा नियम मात्र करायला विसरतो. अनेकदा कारण असतं कि कुणाला काय फरक पडणार आहे आपण नाही हा नियम पाळला तर? पण तसं नाही. सभोवतालच्या गर्दीत कुणीतरी विनाकारण आपण नित्य नेमाने काही गोष्टी कराव्यात याची वाट पहात असतं.
म्हणजे आपण घराचा रिवाज म्हणून, किंवा घरातील थोरा-मोठ्यांनी केलेला नियम म्हणून काही गोष्टी करतो. नव्यानं लग्न होऊन घरात आलेली सून मग अशीच रोज अंगणात सडा घालते आणि आपल्या कलागुणांचे प्रदर्शन व्यवस्थित व्हावे म्हणून एक छानशी रांगोळीही घालते दारात. घरातल्यांसाठी त्यात कौतुकाचे काही शिल्लक राहत नाही. सांगितले ते केले आणि करते आहे हं नियमाने, एवढा एक प्रतिसाद मिळतो आणि मग तो शब्दात रोज व्यक्त करण्याची गरज संपते.
मन मात्र ते कौतुक, ते शब्द रोजच ऐकायला उत्सुक असतं. पण तसं होत नाही. घरातील नवीन व्यक्तीने घराचे नियम पाळावे ही एक अपेक्षा आणि ते नियम नित्य नेमाने पाळले जातात नव्या व्यक्तीकडून म्हणून त्याची दखल घेतली जावी, ही एक अपेक्षा. काय बरं असं मोठं बिकट यात आहे कि ज्यामुळे या दोन अपेक्षांच्या एकत्र येण्याने नात्यांमध्ये गुंता निर्माण होतो? नव्या व्यक्ती नियम पाळावे ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तरी गुंता होतो आणि ती पूर्ण झाली तरी गुंता होतो.
कारण एक अढी यात आहे. आणि ती म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण राहणारी अपेक्षा ज्या एका कामाशी जोडलेली आहे ते आपण स्वतःच्या आनंदासाठी न करता फक्त नियमासाठी करतो. दारात सडा आणि छानशी रांगोळी हा घराचा नियम आहे, असे न मानता घराच्या प्रसन्न अस्तित्वासाठी त्याची गरज आहे, हे जर नव्याने घरात आलेल्या व्यक्तीला सांगितल्या गेले तर? आणि ती प्रसन्नता टिकविणे आता तुझ्या हाती, असं सांगितलं तर?
आणि घरात नव्याने आलेल्या व्यक्तीने ही, आपली हि कृती केवळ एक कर्तव्यभाव म्हणून पाहण्यापेक्षा आपल्या जगण्याचा एक घटक म्हणून स्वीकार केली तर? रोज श्वास घेऊन, खायला देऊन जिवंत ठेवले आहेस बाबा मला, म्हणून शरीर रोज धन्यवाद देतं बसतं? किंवा आपण तशी अपेक्षा ठेवावी? ज्या घरात आता आपण राहणार तिथली हि एक गोष्ट आता माझ्या जगण्याचा घटक आहे, असे मान्य केले तर त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी रोज आपल्याला कौतुकाची थाप मिळावी हि अपेक्षाही काही काळाने निमालेली दिसेल.
आता इथेच तर खरी गंमत आहे. ती असते दाराबाहेरची. घरातील लोक जे करतात त्याला नित्यनेमाने पाहणारे दारासमोरून जातात. हे अनोळखी लोक रोज दारातला सडा आणि ती मन प्रसन्न करणारी रांगोळी पाहतात. कौतुक त्यांच्या डोळ्यात असतं. पण आपल्यापर्यंत ते पोचत नाही. कारण आपण घरातल्या अपेक्षांच्या गुंत्यांत अडकलेलो. पण हे दारासमोरून रोज रांगोळी न्याहाळत जाणारेही एक अपेक्षा घेऊन जगू लागतात. या दारात कायम रांगोळी दिसणारच, ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मनाला सांगितली असते. एक दिवस का सडा-रांगोळी दिसली नाही तर खट्टू मनाने ते दारापुढून जातात. असा कसा या घराने रोजचा नेम मोडला? त्यांचा अपेक्षाभंग होतो.
आता काही वेळेला अशी व्यक्ती कोण हे ठाऊक नसतं आपल्याला. किंवा ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचतही नसेल. पण गृहीत धरायला हवंच का त्यांना? आवश्यक आहे ते? गृहीत धरायला हवंच का कि तुमची कुणीतरी वाट पहातंय? तुम्ही अंगणात सडा टाकून रांगोळी घालणारच, अशी अपेक्षा कुणाची तरी आहे. आणि तुमच्या दारासमोरून तुम्हाला स्वतःचा कुठलाही परिचय न देत तुमच्या सड्याची आणि रांगोळीची अपेक्षा करणारी व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची ठरायला हवी? अशा अनोळखी व्यक्तीच्या अपेक्षांसाठी स्वतःला म्हणून नियम घालून घ्यावेत?
म्हणून म्हटलं, अपेक्षांचे बाई भारी गुंते असतात.

Sunday, December 21, 2014
संवाद
आपण 'कुणीच नाही' या कॅटेगरीत मोडत असताना कलाकृतींच्या सानिध्यात गेलो तर घडणारी बातचीत भन्नाट असते … कुठलाच आविर्भाव नाही… अगदी 'काहीच कळत नाही हं ' आणि 'यातील कशाचाही अजिबात गंध नाही ', हे हि जेव्हा आडवं येत नाही तेव्हाचा संवाद … तुम्ही बसता त्या कलाकृतीसमोर फतकल मारून… कान न्युट्रल… डोळे न्युट्रल आणि मनही न्युट्रल… फक्त कवाडं तेवढी उघडी… अगदी सताड… ऊन, वाऱ्याबरोबरच धूळीसाठीही वेलकमची पाटी घेऊन…
मग कधी अवचित येते
तरळत गाण्यातील तान
लाटेवर वाहत सागराचे उधाण
चित्रातले रंग
उतरतात मनात
शिल्प हि सांगते काही
हळुवार कानात
###
खुर्च्यांची रास… खुर्चीची आस… खुर्चीशी संभोग आणि मग त्या खुर्चीचेच भोग… खुर्च्यांचे विविध आकार… खुर्चीचे बहुविध विकार… खुर्च्यांचा आगळाच बाज… खुर्चीच ताज… तीच सरताज… खुर्च्यांसाठी साधना आणि त्यासाठी तिचीच आराधना… मोठ्या खुर्चीपुढे छोटी खुर्ची… मोठ्या खुर्चीची मिजास मोठी… छोट्या खुर्चीची अदब खोटी… मागे बांधलेल्या हातात कट्यार छोटी… आधाराची खुर्ची… वर नेणारी खुर्ची… छोट्या खुर्चीला स्वतःत सामावून घेणारी खुर्ची…गुलाबी, गुबगुबीत बाळ खुर्चीला मांडीत जोजवणारी भारदस्त पण मोडकळीस आलेली वृद्ध खुर्ची… खुर्च्यांना लगटलेल्या मनुष्याकृती गबाळ… बिभत्स… रंगात बरबटलेल्या… किळसवाण्या… शिसारी आणणाऱ्या… आणि खुर्ची मिळाल्यावर बेसावध खुर्चीच्या अधीन झालेल्या… खुर्चीतून लोंबणारे पाय त्या असूरी खुर्चीनं हातात घट्ट आवळून धरलेले… कधीही खेचून घेतले तर बसलेला सपशेल तोंडघशी पडणार हे निश्चित…
जिला आधारासाठी निर्मिले तिच्याच सत्तेत रुपांतरणाचा हा चित्र प्रवास. नाव Man and a chair आहे खरे. पण इथे दिसते ती a chair ची THE Chair होण्याची चित्तरकथा. सत्ता आणि मनुष्य यांची विविध रूपे…
कुठे?
Chandramohan Kulkarni यांच्या डिजिटल चित्र प्रदर्शनात.
Beauty and obnoxiousness...
एखादे झाड कुरूप आहे म्हणून बाजूच्या तळ्यात न्हाऊन, पानांना विंचरून, फाद्यांमध्ये भांग बिंग काढून, शेजारच्या वेलीवरच्या खुडलेल्या कळ्यांचा गजरा बिजरा माळून नाही मिरवत… मग माणूस का करतो असं? स्वच्छ आणि स्वस्थ राहाणं वेगळं… पण सुंदर दिसण्यासाठीचा अट्टाहास? शरीराला विशिष्ट आकार देण्याचा अट्टाहास… हात, पाय, पोट 'देखणं' करण्याचा अट्टाहास… तंग कपड्यात अतरंगी शरीर कोंबण्याचा अट्टाहास… शरीराचा रंग बदलण्याचा अट्टाहास… काळ्याचा तिरस्कार… पांढरेफट्ट होण्याची जीवघेणी लालसा… आणि यात वास्तवाकडे डोळेझाक… पापण्या कोरून घेणे… हातापायावरची लव काढून टाकणे… चेहऱ्याला ब्लिच लावणे… सगळं आग आग करणारे… डोळ्यावर दोन काकडीचे स्लाईस ठेवून घेतले की सुंदर होण्याच्या अट्टाहासासाठीची आणि वास्तवापासून पळून जाण्यासाठीची सगळी जळजळ क्षणभर शांत झाल्याचा आभास निर्माण करणे… या सगळ्याची कीव करावी की त्याकडे दुर्लक्ष करावे? की हे या घडीचे वास्तव आहे, म्हणून त्याचा स्वीकार करावा? आपणही दोन काकड्यांचे स्लाईस डोळ्यावर ठेवून घ्यावेत की काय?
संदर्भ: Gym Gym आणि Beauty Parlor चित्रमालिका by Chandramohan Kulkarni
###
From minimal to abundance
"You see, I really have wanted to make it so that people get the idea that these folk, who are eating their potatoes by the light of their little lamp, have tilled the earth themselves with these hands they are putting in the dish, and so it speaks of manual labor and — that they have thus honestly earned their food. I wanted it to give the idea of a wholly different way of life from ours — civilized people. So I certainly don’t want everyone just to admire it or approve of it without knowing why." - Vincent Van Gogh on The Potato Eater.
मातीत घाम गाळून दिवसभराच्या श्रमानंतर पिकवलेल्या अन्नाची चव चाखायला डायनिंग टेबल भोवती बसलेले शेतकऱ्याचे कुटुंब आपल्या चित्रात उतरवताना विन्सेंट वँन गॉगला श्रमाचे महत्व विशद करायचे होते. त्याच्या सुसंस्कृत, उच्चभ्रू समाजाहून वेगळं असं हे शेतकऱ्याचे कुटुंब म्हणूनच आपले अन्न हाताने ग्रहण करत.
पण आता काळ आणि परिस्थिती बदलली आहे. त्या मोजक्या, जेमतेम, minimalचा परिघ अवास्तव वाढला आहे. त्या तथाकथित सुसंस्कृत, उच्चभ्रू समाजाने या कष्टकरी समाजाला एक विचित्र न्युनगंडाच्या परिघात ढकलून दिलं आहे. श्रमाच्या महत्वापेक्षाही श्रमाच्या मोबदल्याचा अट्टाहास आणि त्या मोबदल्याचा उपभोग उच्चभ्रू समाजाप्रमाणेच घेण्याचा अट्टाहास. वँन गॉगला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या The Potato Eatersची चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढलेली चित्राकृती हा अट्टाहास अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडते. Minimal to abundance, Potato to french fries, थोडक्यात श्रमाचे समाधान ते सततच्या उपभोगतील अपूर्णता, असंतुष्टी, असमाधान, असा काहीसा हा प्रवास आहे.

अन्न हातात नाही तर काटेरी चमच्यांनी ताब्यात घेतले आहे, वँन गॉगच्या टोप्या घातलेल्या नायिका आता बोडक्या डोक्यांनी, तंग, आधुनिक तोकड्या कपड्यात बसल्या आहेत. त्यांची झुकलेली नजर आता रोखली गेलेली आहे. कोपऱ्यातील टेबलवरची चहाची केटली आता अप्रासंगिक आहे कारण हातात बियरचा मग आलाय. भिंतीवरच्या घड्याळाचा आकार, रुप बदललं आहे. मूळ चित्रातील टेबलवर मध्यभागी मिणमिणताच पण प्रकाश सांडवणाऱ्या दिव्याच्या जागी आता विजेचा दिवा आला आहे. आणि इथेच या minimal to abundanceच्या प्रवासातील कुलकर्णीनी टिपलेला उपरोध अंगावर येतो. अपुऱ्या प्रकाशातही उजळून निघालेले चेहरे आता भरपूर उजेडाची सोय असतानाही अंधार लपेटण्याला उत्सुक आहेत.
पुन्हा तीच कदाचित वास्तवाकडे कानाडोळा करण्याची उर्मी… स्वतःच्या तोकड्या प्रवृत्तींचे, प्रकृतीचे नागवेपण लपवून ठेवण्याची धडपड… दोन काकड्यांच्या चकत्यानी डोळे मिटून घेणे…
वर्षा वेलणकर
Tuesday, December 16, 2014
क्या नाम हैं तुम्हारा?
किस मीट्टी के बने हो तुम?
क्या ज़ात हैं तुम्हारी?
ऐसी क्योंन सी मज़हब के बाशिंदे हो
जो हमनस्ल को हलाक करने का हुक्म देती हैं?
किस उपरवाले के सामने
इबादत के लिए सर झुकाते हो?
आँखे मूँद कर, हाथ फैला कर क्या दुआ माँगते हो?
क्या उसकी सूरत का कोई जर्रा
नजर नहीं आया तुम्हे उस नन्ही जान की आँखों में?
उसका नूर क्या उस मासूम चेहरे पर नहीं था
जिसे तुमने अपनी बंदूक की नोक पर धरा था?
क्या कोई भी रिश्ता नहीं था तुम्हारा उससे
जिसे आज तुमने तार तार कर दिया?
कैसा खून दौड़ रहा है तुम्हारी रगों में
जो उस ख़ौफ़ज़दा, थरथराते जिस्म के
अंदर दौड़ते खून से जुदा हैं?
ये किस मकसद की लड़ाई लड़ रहे हो तुम?
क्या बात रखनी हैं तुम्हें सबके आगे?
क्या मनवाना चाहते हो दुनियासे?
किस चीज़ का बदला लेना चाहते हो?
अब बस घिन आती हैं तुमसे
वर्षा
Sunday, October 26, 2014
चलो, आज एक सपना बो दे
चलो, आज एक सपना बो दे
मिट्टी के ढेरों परतोंके नीचे
जो महीन, काली, गीली सी
हाथों को जो थाम लेती हैं
उस मिट्टी के हवाले कर दे
तेरे मेरे एक नन्हें अरमान का बिज
चलो आज एक सपना बो दे
जो महीन, काली, गीली सी
हाथों को जो थाम लेती हैं
उस मिट्टी के हवाले कर दे
तेरे मेरे एक नन्हें अरमान का बिज
चलो आज एक सपना बो दे
अरमान जो मन में मेरे जागा था
तेरी ख्वाहिशोंके साथ भागा था
हमारी खुली खुली आँखों में
जब आकर बसा था वह
चलो, आज वही सपना बो दे
तेरी ख्वाहिशोंके साथ भागा था
हमारी खुली खुली आँखों में
जब आकर बसा था वह
चलो, आज वही सपना बो दे
आंखोकी बारिशों से जतन करे
कभी छाव, कभी धुप उसपर धरे
जब करवट बदलेगा, साँस लेगा
सपना हमारा हमें आवाज देगा
कभी छाव, कभी धुप उसपर धरे
जब करवट बदलेगा, साँस लेगा
सपना हमारा हमें आवाज देगा
तब हम थामेंगे दामन उसका
और फिर नए सिरेसे करेंगे
एक नए सफ़र का आगाज
एक कोरी करारी मंजिल की ओर
चल देंगे हम...
और फिर नए सिरेसे करेंगे
एक नए सफ़र का आगाज
एक कोरी करारी मंजिल की ओर
चल देंगे हम...
चलो, आज यही एक सपना बो दे
वर्षा वेलणकर
Wednesday, October 15, 2014
उम्मीद
रंगबिरंगे कागजोंके टुकड़ो को
जोड़-जोड़ कर मैंने कुछ
फुल, गुलदस्ते और तितलियाँ बनायीं हैं
जानती हूँ तुम हँस के कहोंगे,
बेजान है ये सारे; वक्त की बर्बादी!
तो फिर जरा याद करों और बताओ,
गीली रेत के बड़े बड़े टीले बनाकर
और दोनों ओर से कुरेदकर
जब हात मिलाते थे टिलोंके अंदर
कस के पकड़ते थे, वों क्या था?
बड़ो ने जिसे बेमानी करार दिया था
उन सपनोंको खरीदनेके लिए
गुल्लक में चव्वन्नि-अठ्ठनीया
जमा की थी, वो क्या था?
उम्मीदेही तो थी वो सारी
कभी साथ न छोड़ने की;
सपनों को अपनाने की
उसी उम्मीद से आज
इन कागजोंकी तितलियोंको
और उन ढेर सारे फुलोंको
रंगों से सजानेका मन हैं
शायद...
उन्हीसे मेरे आंगन में बहार आ जाए!
वर्षा वेलणकर
Subscribe to:
Posts (Atom)